मुंबई | अंबानींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आजोबा आणि पत्नी नीता अंबानी आजी झाल्या आहेत.
अंबानीं अंबानींची सून श्लोकाने गुरुवारी सकाळी 11 वाजता एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्यांकडून निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती देण्यात आली आहे. नवजात बाळ आणि श्लोका अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.
नीता आणि मुकेश अंबानी यांना पहिल्यांदाच आजी आजोबा झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे, अशी माहिती अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर जे. पी. नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल- नरेंद्र मोदी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय!
देशातील ‘या’ नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक