बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन, प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न

नवी दिल्ली | काही महिन्यांपुर्वी ब्रिटन राजघराण्याची सून मेगन मार्केल लवकरच आई-बाबा बनणार असल्याची बातमी केसिंग्टन पॅलेसने काही दिवसांपूर्वीच दिली होती. आता ब्रिटन राजघराण्यात नवीन पाहुणीचं आगमन झालं असून या नव्या पाहुणीचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांना पुन्हा एकदा पालकत्व लाभलं असून त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी मिळून त्यांच्या मुलीचं नाव लिलिबेट डायना असं ठेवलं आहे. या नावामागे देखील कारण असल्याचं समोर आलं आहे. लिली हे नाव मुलीची पणजी म्हणजे, राणी एलिझाबेथ यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. तर मुलीचं डायना हे नाव तिच्या आजीवरून म्हणजे प्रिन्स हॅरी यांच्या आईच्या नावारुन ठेवण्यात आलं आहे.

मे 2018 मध्ये प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल घटस्फोटित आहे. 2013 मध्ये मेगनचा दुसऱ्या नवऱ्यासोबत देखील घटस्फोट झाला. 2016 मध्ये एका मित्राच्या घरी हॅरी आणि मेगन यांची भेट झाली होती. यावेळी हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता मेगनने मान्य केला होता. प्रिन्स हॅरी 33 वर्षांचे असून मेगन 36 वर्षांची आहे.

दरम्यान, शाही कुटुंबाकडून ही आनंदवार्ता सर्वांनाच देण्यात आलेली असली तरीही बाळाचा फोटो मात्र अद्यापही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

इतर राज्यांनी महाराष्ट्र माॅडलचं अनुकरण करावं; उद्योगपतींकडून मुख्यमंत्र्याचं कौतुक

“ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, पण आता…

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More