बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ जानेवारीनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर संघाने भारतात इंग्लंडसोबत मालिका खेळल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघाला बायो-बबल राहण्याची सक्ती केली होती. त्या नियमात संघातील खेळाडूंना बाहेर फिरण्यावर बंदी घालण्यात आली होती. यावरून अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले होते. तर आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील यावर आक्षेप घेत, याचा मानसिक त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. कोहलीच्या या वक्तव्यावर बीसीसीआयने कोहलीला उद्धटपणे उत्तर दिलं आहे.

भविष्यात वेळापत्रक आखताना खेळाडूंच्या मानसिकतेचा थोडा विचार करायला हवा. बायो-बबल वातावरणात राहिल्यानंतर खेळाडूंच्या मानसिकतेत बदल होऊ शकतो. या वातावरणाला कंटाळलेल्या खेळाडूंनाही बदल हवा असतो, असं कोहलीने काही दिवसांपुर्वी म्हटलं होतं. भारत आणि इंग्लंडच्या एकदिवसीय सामन्यानंतर कोहलीनं हे वक्तव्य केलं होतं.

बीसीसीआयने यावरून कोहलीचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय संघातील सर्व खेळाडूंवर सर्व सामने खेळण्याची सक्ती केली नव्हती. दुसरी फळी सक्षम असताना खेळाडूंसमोर विश्रांतीचा पर्याय उपलब्ध होता, असं उत्तर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने कोहलीला दिलं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकावर टीका करणारे खेळाडू आयपीएलबाबत अशी टीका करू शकतील का? आयपीएल संघातून बाहेर पडतील का?, असा खोचक प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, कोहली नेहमी संघाच्या व्यस्त वेळापत्रकावरून बीसीसीआयवर टीका करताना दिसतो. इंग्लंड दौऱ्यानंतर कोहली बायो-बबल सोडून घरी गेला होता. त्याचा एक फोटो देखील त्याने शेअर केला होता. तर 9 तारखेच्या आयपीएल सामन्याआधी कोहलीला पुन्हा 3 ते 5 दिवस विलगीकरणात रहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचं कॅनडामध्ये निधन!

पुणे पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’; 175 गुन्हेगारांवर केली धडक कारवाई

“नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”

‘लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू’; भरत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

राज्यात एकाच दिवशी तब्बल 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More