बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

नवी दिल्ली | एका वृत्तवाहिनीच्या डिबेट कार्यक्रमामध्ये भाजप नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकचक झाल्याचं पाहायला मिळाली. कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, गरिबी,कोरोना यासारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं.

भाजपने देशातील मोठ्या संस्थांचंही नुकसान केलं आहे. मोदी सरकार चीनचं नाव घ्यायलाही घाबरत आहे. पण इंदिरा गांधींनी जगाचा नकाशा बदलून पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याचं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. त्यावरून संबित पात्रा भडकले.

मुळ मुद्यावरून भटकून चर्चात चीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन चांगलाच वादविवाद रंगला होता. त्यावेळी, संबित पात्रा यांनी 2008 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चीनला जाऊन सह्या केल्याचा मुद्दा चर्चेत आणला. त्यावेळी, किती रुपयाची घेवाण-देवाण झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याच्या या खोट्या आरोपावरून सुप्रिया श्रीनेत भडकल्या आणि त्यांनी संबित पात्रा यांना जोकरपंती म्हटलं. त्यासोबत संबित पात्रा गटारीतले किडा आहे, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, अशा संतापजनक आणि व्यर्थ डिबेटमुळे काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून अशा सनसनाटी चर्चा कार्यक्रमांसाठी आचारसंहिता लागू करण्याची मागणी केली होती. अशा डिबेटमुळे काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं.

थोडक्यात बातम्या-

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

“मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच पडली पाहिजे”

‘परमबीर सिंग यांच्या इशाऱ्याने वाझेकडून खंडणी वसुली’; कार डिझायनरच्या पत्राने खळबळ

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

एका मृत्यूचा मुद्दा बनवला जातोय, लसीचे दोन डोस घेऊन मेलेल्या अनेक डॉक्टरांचं काय?- बाबा रामदेव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More