पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला (Bjp) पाठिंबा जाहीर केला आहे. याचदरम्यान राज ठाकरेंचा आदेश डावलून महाविकास आघाडीचे उमेदवार कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचार करणाऱ्या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर मनसेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईविरोधात तब्बल 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत मनसे(Mns)कडून सात पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
यात रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे.
या कारवाईनंतर मनसेत मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. मात्र या कारवाईमुळे भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का बसला आहे. तर रविंद्र धंगेकर यांना फायदा झालाय.
दरम्यान, निवडणूत जाहीर झाल्यापासून मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र मनसैनिक प्रचार करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
- शिवसैनिक म्हणतायेत, “असा पाडा की बाकी गद्दारांना धडकी भरली पाहिजे!”
- पुण्यात मनसेला धक्का; कार्यकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय
- मोठी बातमी! संजय राऊत यांना मोठा झटका
- ‘मी वीणाचा टॅटू काढून टाकणार नाही कारण…’; शिव स्पष्टच बोलला
- MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!