बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेला हल्ल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | सोलापुरमध्ये भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना घडली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय कॉलनी, मड्डे वस्ती भागात बैठकीसाठी आले असता अज्ञात युवकाने त्याच्या गाडीवर दगडफेक केली. यानंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीचा असा पहिल्यापासूनचा उद्योग सुरू आहे. कोणालातरी पुढे करायचं आणि त्याचं चित्र वेगळं दाखवायचं. मला रोज त्यांचे फोन येतात, मेसेज येतात. परंतु मी त्यांना उत्तर देत नाही. हे कोणी केलं हे माहित नाही. पोलीस तपास करतील, असं म्हणत अप्रत्यक्षपणे पडळकरांनी राष्ट्रवादीवर आरोप केला. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.

जी घटना झाली ही कुठल्याही सन्माननीय सदस्याच्या गाडीवर होऊ नये, मात्र, हा भारतीय जनता पक्षाकडून घडवून आणलेला स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वत: प्रकाश झोतात यायचं. मग सुरक्षेची मागणी करायची, अशी टीका अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केली.

शरद पवारांवर ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते. हलकटपणाची भाषा करुन टीका करणाऱ्यांनी पब्लिसिटी करणाऱ्या भाजपने शहानपणा शिकवू नये, असं अमोल मिटकरी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं”

सरकारला कसं अडचणीत आणायचं?, फडणवीसांच्या घरी प्लॅन ठरला

“ममतादीदींप्रमाणे सुल्तानी पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा सामना करायला हवा”

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More