बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तालिबानी महिला क्रिकेटपटूंना खेळू देणार नसतील तर…’; ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा तालिबान्यांना मोठा दणका!

सिडनी | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर देशात अनेक निर्बंध लावले आहेत. अफगाणिस्तानच्या लहान मुलांसह महिलांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळात सामील करून घेण्यासाठी महिलांनी मंगळवारी पाकिस्तानच्या दुतावासासमोर आंदोलन केलं होतं. अशातच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंच्या क्रिकेट खेळण्याबाबत तालिबान्यांना झटका दिला आहे.

तालिबानची राजवट जेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे. तेव्हापासून तेथील महिलांवर मोठ्या प्रमाणात तालिबानने निर्बंध लादले आहेत. याच पार्श्वभूमीवर जर तालिबान अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना क्रिकेट खेळू देणार नसेल तर आम्ही अफगाणिस्तानच्या पुरूष क्रिकेट संघासोबत क्रिकेट खेळणार नाही आहे, असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने म्हटलं आहे.

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यातच अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. परंतु संघाची घोषणा होताच अफगाणिस्तानचा स्टार फीरकीपटू राशिद खानने कर्णधारपद सोडलं आहे. संघ निवडीच्या प्रक्रियेत सहभाग करून न घेतल्यामुळे राशिद खानने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही आहे, असं तालिबानच्या प्रवक्त्याने अलीकडेच म्हटलं होतं. सध्या अफगाण महिलांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशभरात अफगाण महिलांचा विषय चर्चेत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डच्या निर्णयांकडे तालिबान कसं पाहणार आहे. ते बघणं आता आपल्याला सर्वांना औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आधी पाॅर्न वेबसाईट त्यानंतर…; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केल्या धक्कादायक गोष्टी!

ऐकावं ते नवलच! लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरते उपायकारक

सीरम इन्स्टिट्युटला केंद्राची नवीन ऑर्डर; वर्षाच्या शेवटी मिळणार ‘इतक्या’ कोटींच्या लशींचा डोस

मोठी बातमी! पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट, अखेरचा सामना रद्द

‘मौका सभी को मिलता है’ म्हणत नितेश राणेंचा विरोधकांना इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More