बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा IPL सोडण्याचा निर्णय, मात्र ॲास्ट्रेलियन पंतप्रधांनांनी त्यांना दिला मोठा झटका

मुंबई | 27 एप्रिलपासून ऑस्ट्रेलियाने भारतीय प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लिनने आयपीएलनंतर खेळाडूंना परतण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खास विमानांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. यावर आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करणार नसल्याचं म्हटलं आहे.

सर्व क्रिकेटपटू खाजगीत आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात गेले आहेत. ते कोणत्याही ऑस्ट्रेलियन दौर्‍याचा भाग नाहीत. त्यामुळे तेथे त्यांच्याकडे ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, त्या खेळाडूंना फक्त त्यांचा वापर करून घरी परत जावे लागेल, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केलं आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या या निर्णयामुळे आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कोंडी झाली आहे.

इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी विनंती मुंबईचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लिनने केली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम जंपा या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी आयपीएलमध्ये आपल्या खेळाडूंच्या आरोग्याच्या आणि प्रवासाच्या व्यवस्थेची माहिती घेतली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या या निर्णयामुळे आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कोंडी झाली असल्यानं ऑस्ट्रेलियन खेळाडू काय निर्णय घेतील हे पहावं लागेल.

थोडक्यात बातम्या-

परभणीत नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळती

यॉर्कर राज सिराज! अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूचा अवघ्या एका धावेने विजय

भारत बायटेकने जाहीर केली लसीची किंमत; सीरमची लस स्वस्त की भारत बायटेकची?, जाणून घ्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूंचं कोरोनामुळे निधन

“मेच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नाही, मोदी सरकारनं स्टॉक बुक केला आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More