बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारे लेखक द. मा. मिरासदार काळाच्या पडद्याआड!

पुणे | मराठी साहित्य विश्वातील जेष्ठ विनोदी लेखक आणि कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द.मा. मिरासदार यांची वृद्धापकाळानं प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी पुण्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. द.मा.मिरासदार यांच्या लिखानातील विनोदी कथा प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये झाला होता.

द.मा. मिरासदार यांनी काही वर्ष पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी अध्यापन क्षेत्रात 1952 ला सुरूवात केली. पुण्यातील कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून कार्यरत होते. द.मा.मिरासदारांच्या कथांमधील माझ्या बापाची पेंड, व्यंकूची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, हरवल्याचा शोध, माझी पहिली चोरी, बाबू पैलवान अशा अनेक कथांचे उत्कृष्ठ लेखनामुळं रसिकांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलं होतं.

द.मा. मिरासदारांच्या कथांमधील आशय हा ग्रामीण जीवणावर आधारित होता. त्यांच्या स्पर्श, विरंगुळा, कोणे एके काळी सारख्या कथांमधून त्यांनी गंभीरपणे जीवणातील वर्णन टिपलं. त्यांच्या एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या चित्रपटांमधील संवादासाठी त्यांना उत्कृष्ठ लेखनासाठी पारितोषके मिळाली होती.

दरम्यान, द.मा.मिरासदार यांच्या निधनानं मराठी साहित्य विश्वातील व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्या तोडीचा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.  रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारा लेखक आपण आज गमावला आहे.

 

थोडक्यात बातम्या –

‘तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो…’; ऑडिओ क्लिपबाबत रामदाम कदम यांची पहिली प्रतिक्रिया!

‘या’ चार गोष्टी असतील तरच देशाचा विकास होऊ शकतो- नितीन गडकरी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“देशातील कोणत्याही भागात गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोक म्हणतात गडकरींची कृपा”

“मला मुंबई इंडियन्सला पराभूत होताना पाहायचंय, चॅम्पियन होताना नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More