“पंकजा मुंडेंवर आरोप करून शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम सत्ताधारी करतायेत”
मुंबई | माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात कथित चक्की प्रकरण घोटाळा समोर आला होता. या प्रकरणात वेगवेगळे ट्विस्ट समोर येताना दिसतायेत. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात आणखी एफआयआर का दाखल केला नाही? असा सवाल केला होता. या प्रकरणावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या कृत्याचा आरोप थेट मंत्र्यांवर लावणे हे चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम सत्ताधारी करतायेत, असा आरोप देखील ठाकरे सरकारवर केला आहे.
एखादा मंत्र्याचा थेट हस्तक्षेप होऊन घोटाळा झाला असताना मंत्र्यांवर आरोप करता येतो. मात्र, प्रशासकिय कंत्राटदरांकडून घोटाळा झाला असेल तर त्याला मंत्री नाही तर ते जबाबदार असतात. त्यामुळे मंत्र्याची काहीही चुक नसताना त्याला आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नसल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं.
दरम्यान, चिक्की घोटाळा समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. चिक्की व मोबाईल गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची चौकशी समिती माझ्या अध्यक्षतेखाली नियुक्त करावी. तेव्हाच खरा प्रकार समोर येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्यानं पंकजा मुंडेच्या अडचणी वाढणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट
कोरोनानंतर आता वाढतोय ‘हा’ आजार; शेतकऱ्यांना अधिक धोका
दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी
सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही डीआरएस गमावला तरीही विराट पंतवरच बिघडला
Comments are closed.