श्रीरामपूर | साहित्य अकादमी व शब्दालय प्रकाशन यांच्या वतीने 1 व 2 जुलै रोजी श्रीरामपूर येथे ‘नव्वोदत्तरी नाटक : आशय आणि रूप’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र पार पडलं. यावेळी गेल्या तीन दशकांचा अतीशय व्यामीश्र काळ, जागतिकीकरण, नष्ट होत चाललेली सामुहिक सहकार्याची भावना, राजकीय, सामाजिक उलथापालथ, न्यूक्लिअर फॅमिलीच्याही पलिकडे पोहोचलेली कुटुंबव्यवस्था यासह अनेक घटनांचा नव्वदोत्तरी मराठी नाटकाच्या आशय आणि रूपावर नक्कीच खोलवर परिणाम झालेला आहे. मराठी नाटकाची परंपरा कायम ठेवताना नव्वदोत्तर नाट्यकर्मींनी व्यक्तीकेंद्री अनुभवाधिष्ठीत नाटकाच्या पलीकडे जाऊन नव्या शक्यतांच्या वाटांचा धांडोळा घेतल्याचे दिसून येते, असा सूर उमटलेला पाहायला मिळाला.
नाटक ही एकट्याची कला नाही. तो सामुहिक कलाप्रकार आहे. अलीकडच्या दोन दशकातील पिढीची संवेदना ही दृष्यात्मकतेशी जोडली गेली आहे. ही पिढी दृष्यात्मक गोष्टी पहात आली आहे. त्याच्या हातात मोबाईल आलाय. तो लिखित गोष्टी वाचण्यापेक्षा दृष्यात्मकतेशी जास्त जोडला गेला आहे. ही पिढी उद्याचे क्रांतीकारक नाटक कसे लिहू शकेल, याची मला उत्सुकता आहे, असे प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर म्हणाले.
गेल्या तीन दशकातील आपल्या जीवनशैलीत अधिकच विस्कळीतपणा आला. त्यातच ‘खाऊजा’ संस्कृतीमुळे आधुनिकताधिष्ठित जीवन शैलीतील जीवनमूल्यांना बाद ठरवणारे कलह सुरू झाले. ह्या सर्व बदलांचा मराठी नाटक आणि रंगभूमीवर अधोरेखित करता येईल एवढा परिणाम झाला, असे दत्ता भगत यांच्या बीजभाषणाने नमूद केले. उद्घाटन कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यीक तथा साहित्य अकादमीचे मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य राजन गवस यांनी शहरी संस्कृतीच्या पलिकडे जाऊन रंगभूमीचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रसिद्ध कवयित्री तथा साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाच्या सदस्य सुमती लांडे यांनी या परिसंवादाच्या निमित्ताने श्रीरामपूरसारख्या छोट्या शहरातून नाट्य जाणीव जागी होऊन रंगभूमीविषयीची उत्सुकता निर्माण होईल, असे सांगितले. साहित्य अकादमीचे कार्यक्रम अधिकारी ओम प्रकाश नागर सहभागी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दरम्यान, दुपारच्या सत्रात ‘नव्वदोत्तरी नाटकाचे सादरीकरण’ या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध नाट्य अभ्यासक नीळकंठ कदम, स्वागत थोरात व दिग्दर्शक सचिन शिंदे सहभागी झाले. ‘ मराठी नाट्यपरंपरा आणि नव्वदोत्तर मराठी नाटक’ या विषयावर प्रसिद्ध समीक्षक नीलकंठ कदम, प्रतिक पुरी, रमेश रवालकर व दत्ता पाटील सहभागी झाले होते. नीळकंठ कदम यांनी गेल्या दोन दशकातील प्रतिभावंत नाटककारांच्या नाटकांची उदाहरणे देवून भविष्यकाळ आशादायी असल्याचे सांगितले. प्रतिक पुरी यांनी नाटककारांनी आपला अनुभवाचा, अभ्यासाचा पैस अधिक विस्तारण्याची गरज प्रतिपादीत केली. तर रमेश रावळकर यांनी रंगभूमीच्या इतिहासाचा पट मांडत नव्या नाटककारांची नाटके विविध विषय हाताळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दत्ता पाटील यांनी ग्रामीण व शहरी संस्कृतीतील नाटक हा महत्वाचा दुवा ठरू शकतो असे सांगितले. शेवटच्या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचे नाट्य वाचन झाले. तर सुमीत लांडे यांनी आभार मानले.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”
शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…
कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर
‘शेवटी अंत जवळ आला आहे’, किरीट सोमय्यांची बोचरी टीका
“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”
Comments are closed.