बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एचडीएफसीच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीवर बॅंकेनं दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सगळीकडे लाॅकडाऊन करण्यात आलं होतं. या कोरोना काळात नागरिकांना याचा फटका बसलेला पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचंही या कोरोना काळात मोठं नुकसान झालं. अशातच सोशल मीडियावर एका बॅंकेच्या जाहिरातीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.

एचडीएफसी बँकेने दिलेल्या एका जाहिरातीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं की, कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या नोकरीसाठी अर्ज करू नये. एचडीएफसी बँक तामिळनाडू शाखेने त्यांच्या शाखेत विक्री अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती करण्यासाठी जाहिरात जारी केली होती. मात्र ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर या बॅंकेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीमध्ये पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या कामाच्या जाहिरातीमध्ये एचडीएफसी बँकेचा लोगो वापरण्यात आला आहे. ‘आम्हाला तुमचे जग समजते.’ असेही त्याखाली लिहिले आहे. 28 वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र असतील अशांनी अप्लाय करावं, असं त्या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, याविषयी बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. बँकेनं आपली चूक मान्य केली असून जाहिरात टाईप करत असताना त्यामध्ये चूक झाल्याचं म्हटलं आहे. बँकेनं आता एक नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असाही उल्लेख केला आहे.

थोडक्यात बातम्या –

प्रशांत किशोर यांनी दिला मुख्य राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा!

7 मुलांच्या 67 वर्षीय बापाने केला 19 वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह, केली ‘ही’ मागणी

‘झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका’; आरोग्यमंत्री राजेश टोपेेंचं जनतेला आवाहन

“ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून संपले, हा या देशाचा इतिहास”

“जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More