बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जंगलाच्या राजावर झेब्रा पडला भारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. जंगलच्या राजाचा एक व्हिडीओ सोशल मडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सिंहाने केलेली शिकार आपण अनेकदा टीव्हीवर बघतो. पण या व्हिडीओत जंगलाच्या राजालाच अद्दल घडलेली पाहायला मिळत आहे.

‘जरूरत पडी तो चुहा भी शेर बन जाता है’, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. या व्हिडीओत प्राण वाचवण्यासाठी झेब्र्याने (Zebra) थेट सिंहाला (Lion) टक्कर दिली आहे. शिकार शोधत असलेला सिंह झेब्र्याजवळ पोहोचला आणि झेब्र्याला काही कळण्याआधीच अचानक झडप घातली.

सिंह आणि झेब्र्यात चांगलीच जुंपलेली या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आपला जीव वाचू शकतो अशी जाणीव होताच झेब्राही चवताळून उठला आणि सिंहावर पलटवार केला. झेब्र्याला खाली पाडण्यासाठी सिंहाने प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले.

झेब्र्याने पुर्ण जोर लावत आपली मान वेगळ्या दिशेला वळवली आणि संधी साधत सिंहाच्या तावडीतून पळ काढला. झेब्र्याने बळ लावत जंगलाच्या राजालाच मात दिली. झेब्रा आणि सिंहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ- 

 

थोडक्यात बातम्या-

‘…तो शुद्ध हलकटपणा होता’; नितीन राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकर संतापले

परमबीर सिंहांना जोर का झटका; ‘त्या’ फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही

‘आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून?’; संजय राऊत भाजपवर बरसले

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचा मोठा निर्णय, आता खासगी फोटो आणि व्हिडीओ…

‘2024 मध्ये 300 खासदार निवडून येतील असं वाटत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More