बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सांगलीच्या राजकीय आखाड्यात रंगणार दोन पाटलांची लढत!

सांगली | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुन्हा एकदा आमने- सामने आले आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर नेहमी जहरी टीका करून राजकीय सभा गाजवत असतात. सांगली हा जयंत पाटील यांचा राजकीय गड आहे. आता त्याच सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीच्या निमित्ताने हे नेते समोरासमोर आले आहेेत.

सांगली महानगरपलिकेत पक्षीय बलाबल पाहता, भाजपचे सर्वात जास्त 41 सदस्य आहेत. राष्ट्रवादी  आणि काॅंग्रेस आघाडीचे 34 सदस्य आहेत. तर दोन सदस्य हे अपक्ष आहेत. सांगली महानगरपलिकेत सध्या एक जागा ही रिक्त आहे. 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला आणि काॅंग्रेसला धक्का देत भाजपने सत्ता स्थापन केली होती. पण नेहमीप्रमाणे गटबाजीचा फटका भाजपला बसला आहे.

आता सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीच्या निमित्ताने पुन्हा चंद्रकांत पाटील आणि  जयंत पाटील आमने सामने आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडीवेळी जयंत पाटील यांनी सर्वांना धक्का देत सत्ता हस्तगत केली. भाजपचे 6 सदस्य फोडून काॅंग्रेस आघाडीने आपली सत्ता स्थापन केली आहे. स्थायी समिती म्हणजे महानगरपालिकेची तिजोरी असते. या तिजोरीला ताब्यात ठेवण्यासाठी भाजप आपले सदस्य फुटू नये म्हणून काळजी घेत आहे. तर जयंत पाटील भाजपला धक्का देण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, भाजपवासी झालेले सुरेश आवटी यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. सुरेश आवटी यांचे सुपुत्र निरंजन आवटी यांना सभापती करण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा आहे. भाजपचं संख्याबळ जास्त असताना असे डावपेच चालू असल्यानं दोन्ही प्रदेशाध्यक्ष आपली ताकद आजमावत आहेत.

थोडक्यात बातम्या 

“…नाहीतर सप्टेंबरमध्ये कोरोना नियम कडक करावे लागतील”

अनिल देशमुखांच्या जावयाची तब्बल 20 मिनिटं सीबीआय चौकशी

धक्कादायक! राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ पाहा आकडेवारी

अमेरिकेच्या पाठीचा कणा मोडला, आता भारतातील…; अल-कायदा संघटनेनं तालिबान्यांना चिथवलं

पुण्यात कोरोनाचा वाढता आलेख! नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ, पाहा आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More