बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; राबवणार ‘ही’ मोहिम

नवी दिल्ली | भारतात येत्या 5 दिवसात आयपीएलचा थरार रंगणार आहे. मागील वर्षी आयपीएल सामने दुबईत प्रेक्षकांविना खेळले गेले. तर यावर्षी हे सामने भारतात होणार आहेत. भारतात होणारे  सामने मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील प्रेक्षकांविना होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएल तोंडावर येऊन ठेपली असताना बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बीसीसीआयने आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी बीसीसीआयने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावदेखील पाठवला असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. बीसीसीआय खेळाडूंच्या लसीकरण मोहिमेचा गंभीरपणे विचार करत आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले.

कोरोनासंबंधी बीसीसीआय योग्य ती खबरदारी घेत आहे. यासाठी 6 बायो बबल केंद्रांची निर्मिती केली आहे.  खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी खेळाडूंची संख्या वाढवण्यात आली आहे, असं देखील राजीव शुक्ला यांनी सांगितलं. वानखेडे स्टेडियमवरील 10 देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली होती. तर 8 संयुक्त समिती कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल याला नुकताच कोरोना झाला.

दरम्यान, लस घेतल्यानंतर सामान्यतः नागरिकांना अंग दुखी, ताप येणं, आणि डोकं दुखी सारखा त्रास होत आहे. लसीकरण झाल्यानंतर आराम करण्याचा सल्ला डाॅक्टर देत असतात. त्यातच जर खेळाडूंना लस दिली तर काही खेळाडूंना काही सामन्यास मुकण्याची शक्यता आहे. मुख्य खेळाडू सामने खेळू शकले नाही तर गुणतालिकेत याचा परिणाम नक्की जाणवेल, त्यामुळे बीसीसीआयने योग्य प्रकारे नियोजन करण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

इरा नाही तर ‘हे’ आहे आमिर खानच्या मुलीचं खरं नाव; चुकीचं नाव उच्चारल्यास आता 5 हजारांचा दंड

“मला कोहली आणि रोहितकडून फटकेबाजी शिकायचीय”; भारतीय संघातील ‘या’ मोठ्या खेळाडूचं वक्तव्य

साईबाबा मुसलमान असल्याचा आरोप करत मंदिरातून साईंची मूर्ती हटवली!

…म्हणून पतीनेच घराला लावली आग, पत्नी आणि मुलांचा मृत्यू

गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More