बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला येत्या 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. सर्व संघ आपापल्या परीने जोरदार तयारी करत आहेत. जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. या लीगमध्ये कित्येक खेळाडूंची स्पप्न साकार झाली आहेत. मागच्यावेळी युएईमध्ये झालेली स्पर्धा यंदा भारतात होत आहे. मात्र स्पर्धा चालू होण्याअगोदर बीसीसीआयने एक निर्णय घेत सर्व संघाना धक्का दिला आहे.

बीसीसीआयच्या नियमांनुसार आता प्रत्येक संघाला 1 तास 30 मिनिटांमध्ये 20 षटकं पूर्ण करावी लागणार आहेत. याआधी 90 व्या मिनिटाला 20वी ओव्हर सुरू व्हायची. 90 मिनिटांमध्ये प्रत्येक टीमला अडीच-अडीच मिनिटांचे दोन टाईम आऊट मिळायचे. म्हणजेच प्रत्येक संघाला 85 मिनिटांमध्ये 20 ओव्हर टाकणं बंधनकारक आहे.

मग आता या हिशोबाने प्रत्येक संघाला एका तासाला 14 पेक्षा जास्त षटकं टाकावी लागणार आहेत. संघाने जर वेळेत षटकं पूर्ण केली नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर त्यासोबतच आयपीएल 2021 मध्ये सॉफ्ट सिग्नलचा नियम लागू नसणार आहे. कारण यावरून भारत-इंग्लंडमध्ये मालिकेमध्ये वाद झाला होता. यावरून क्रिकेट तज्ञांनीही यावर आक्षेप घेतला होता.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलच्या पहिला सामना हा गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! शताब्दी एक्सप्रेसच्या आगीनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमारला कोठडीत खायला मटण”

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 3 हजार पार!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

मनोरंजनाच्या पडद्यावर देखील कोरोनाचं सावट ‘या’ शोमधील 18 जणांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More