Top News देश

धक्कादायक! समुद्रकिनारी प्राचीन वस्तु म्हणून आणली घरी पण घडलं विचित्रच

ब्रिटन | आपण समुद्रकिनारी फिरायला जातो तेव्हा तिथले शंख, शिंपले घरी आणते. मात्र ब्रिटनमध्ये माय-लेकींना घरी आणलेली एक वस्तु त्यांना महागात पडली आहे. कारण त्यांच्यासोबत घडलंच विचित्र. जोडी क्रूज असं महिलेचं नाव असून इसाबेला तिच्या 8 वर्षाच्या मुलीचं नाव आहे.

ब्रिटनच्या कॅटमध्ये राहणारी महिला आपल्या मुलीसोबत समुद्र किनाऱ्यावर गेली होती. तेव्हा त्यांना तिथे एक अजबगजब वस्तु सापडते. सुरूवातीला त्यांना प्राचीन वस्तु किंवा एखाद्या प्राण्याची हाडे वाटलीत. त्यांनी ती आपल्या घरी नेलीत.

वस्तु काय आहे यासाठी पुरातत्व विभागाच्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर याचा फोटो पोस्ट केला. मात्र त्यांना कोणी काहीच माहिती दिली नाही. त्यांनी सोशल मीडियावर माहिती घेत त्या वस्तुला पिन लावली तर त्याची एक बाजू पिघळण्यास सुरुवात झाली, त्यानंतर संपूर्ण वस्तू एका आगीच्या गोळ्याप्रमाणे झाली त्यातून धूर निघू लागला आणि त्याचा स्फोट झाला.

दरम्यान, ती वस्तु म्हणजे 80 वर्षापूर्वीचा ग्रेनेड होतं. मात्र याची त्यांना कल्पनाही आली नाही. नशिब चांगलं म्हणून मायलेकी सुखरूप वाचल्या. नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

थोडक्यात बातम्या-

ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक

धक्कादायक! पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमध्ये महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न!

3 कोटी काय अद्याप 1 रूपयाही खर्च केला नाही; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

घरात पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड सापडल्याच्या वृत्तावर प्रताप सरनाईकांनी केला खुलासा; म्हणाले…

रशिया-अमेरिकेवर मुख्यमंत्री बोलतात, महाराष्ट्रात काय दिवे लावलेत बोला- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या