बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खाकीतील सौंदर्य आणखीनच खुललं; PSI पल्लवी जाधव यांच्या डोक्यावर Miss Indiaचा ताज!

नवी दिल्ली | जालना शहरातील दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी राजस्थानमधील जयपूर येथे नुकतेच झालेल्या ग्लमोन मिस इंडीया या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवला आहे.

पल्लवी जाधल यांचा जीवन प्रवास संघर्षमय राहीला असून त्यांच्या कुटुंबियांनी कोयता हातात धरुन ऊस तोडून, हमी योजनेच्या कामात कामावर खड्डे खोदणाऱ्या आणि मिळेल ते काम करुन आपल्या रक्ताचं पाणी करुन पल्लवी यांना शिक्षण दिलं आहे.

20 मे 2015 रोजी पोलिस उपनिरीक्षक म्हणून पल्लवी जाधव यांची निवड झाली होती. त्यानंतर आॅक्टोबर 2015 मध्ये एक वर्ष प्रशिक्षण घेऊन एमए या विषयात देखील त्या पारंगत झाल्या आहेत.

सध्या पल्लवी जाधव यांनी विधीज्ञ म्हणून आभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.

कामाचा व्याप तसेच आपली जबाबदारी उत्कृष्टपणे निभावत पल्लवी यांनी त्यांचा छंद देखील जोपासला आहे. पोलिस निरीक्षकाची मोठी जबाबदारी पार करत असताना आपला छंद जोपासणं ही सोपी गोष्ट नसून त्यांनी आपल्या छंदामध्ये यश मिळावलं आहे.

राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या ग्लमोन मिस इंडिया या स्पर्धेत उत्तम कामगिरी करुन प्रथम क्रमांक घेतल्या कारण पल्लवी यांच्यावर समाजातील सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More