बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताची सुवर्णयुगाला सुरूवात, नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द नाहीत- अजित पवार

मुंबई | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातुन कौतुकाचा वर्षांव होत आहे. नीरजने ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकला आहे. नीरज चोप्राचं अभिनंदन करायला माझ्याकडे शब्द नाहीत, आता खऱ्या अर्थाने भारताला सुवर्ण युगाची सुरूवात झाली आहे. सुवर्णपदक जिंकुन नीरजने इतिहास रचला आहे, असं कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

देशाला मैदानी प्रकारातलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिल्यानं देशाचा गौरव वाढला आहे. कोट्यवधी भारतीय लोकांची मने जिंकली आहेत. ऑलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ आता संपला आहे. त्याने केलेल्या अविस्मणीय कामगिरीचा सगळ्या देशाला अभिमान वाटत आहे. असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. त्या गावात भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. इतरांप्रमाणे सुरूवातीच्या काळात नीरज ही गावात क्रिकेट खेळत होता. परंतु नीरज चोप्राने मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्टस् पटीयाला येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता, तर आशियाई स्पर्धेत 88.06 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं होतं.

दरम्यान, नीरज चोप्राच्या या दमदार कामगिरीस हरियाणा सरकारच्या वतीने 6 कोटी रूपायांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पहिला मेजर ध्यानचंद पुरस्कार मोदी सरकारलाच द्या- सक्षणा सलगर

“तुम्हाला मेहनतीचा जेव्हा थकवा येत नाही तेव्हा समजून जा तुम्ही इतिहास रचणार आहात”

देशात 4 लाख 12 हजार123 सक्रीय रूग्ण तर…; वाचा ताजी आकडेवारी

…अन् तिचं स्वप्न अधूरंच राहिलं; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला विकावं लागतंय पार्किंग तिकीट!

जेवढ्या गाई तेवढंच तूप विकतो, आम्ही रामदेव बाबांसारखं करत नाही- विजय वडेट्टीवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More