बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी, ते भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत”

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांमध्ये सतत कोणत्या न कोणत्या मुद्यावरुन खटके उडताना दिसतात. राज्य सरकार मधील अनेक मंत्री राज्यपालांच्या कारभारावरुन त्यांच्यावर टीका करत असतात. राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी देखील मंगळवारी राज्यपालांच्या दौऱ्यावरुन त्यांच्यावर गंभीर टीका केली होती.

अशातच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील राज्यपालांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर घणाघात केला आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्यात भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करताना दिसतात, अशी टीका नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्याप्रकारे काम करत आहेत. त्यावरुन असं दिसून येतं की ते घटनात्मक पदासाठी नाही तर भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत. राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी आहे. हे भारतीय लोकशाही विरुद्धचे षडयंत्र आहे, असंही टीका नितीन म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, भगतसिंग कोश्यारी हे आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत ते राज्यपाल आहेत. सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यपालांच्या बैठका होत आहेत. ही सरकारी कामात ढवळाढवळ आहे. राज्यात सत्तेची दोन केंद्रं असल्याचं भासवण्याचा प्रयत्न राज्यपालांकडून सुरु आहे.

थोडक्यात बातम्या –

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

प्रियांका चोप्राने मुंबईमधील दोन अलिशान बंगले विकले, ‘इतक्या’ कोटींची झाली डील

भारतासाठी आनंदाची बातमी! रवी दहियाचा धोबीपछाड देत फायनलमध्ये प्रवेश, सुवर्णपदकाची संधी

पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने केलं असं काही की…

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More