‘मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
मुंबई | भारत आणि न्युझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघासाठी इंग्लंड दौरा देखील आयोजित केला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या खेळपट्टीची ओळख होण्यास मदत होणार आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण बुमराहच्या अनुपस्थित भारतीय संघात मोहम्मद सिराजचा पर्याय असावा, असा सल्ला भारतीय संघातील माजी गोलंदाजाने दिला आहे.
बुमराहच्या प्रतिभेकडे पाहता संघात त्याच्यासारखाच पर्यायी गोलंदाज असणं गरजेचं आहे. तो एक चांगला आणि सामना जिंकणारा गोलंदाज असल्यानं त्याला कोणी पर्याय असू शकत नाही. पण मोहम्मद सिराजमध्ये ती क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये सिराज आणि बुमराह यांच्यात साम्य आहे. डावखुऱ्या फलंदाजांसाठी दोघांचेही चेंडू बाहेर पाडतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सरळ राहतात, असं वक्तव्य भारतीय संघाचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी याने केलं आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या गडी बाद करण्याच्या पद्धतीतही भरपूर साम्य आहे. मोहम्मद सिराज आणि बुमराह हे त्रिफळाचीत, पायचीत आणि यष्टीच्या मागे झेलबाद करण्यात अग्रेसर आहेत. जर बुमराह संघात नसेल तर कर्णधारांकडे बचावाऐवजी आक्रमक पर्याय असणं आवश्यक आहे, असं देखील बालाजी यानं म्हटलं आहे.
दरम्यान, मागील काही सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज याने आक्रमक गोलंदाजी करत फलंदाजांचे त्रिफळे उडवले आहेत. आयपीएलमध्ये राॅयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्याकडून खेळताना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला प्रभावित केलं होतंं. त्यानंतर त्याचं भारतीय संघात पदार्पण निश्चित होतं.
थोडक्यात बातम्या-
PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू
शाइनिंग करत पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग करायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ
उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
देशात कोरोना मृतांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा ओलांडला; नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट
“तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं”, महिलेचा विनयभंग करुन मारहाण
Comments are closed.