नवीन वर्षात झाले ‘हे’ मोठे बदल, खिशाला लागणार कात्री

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या सुुरुवातीलाच अनेक मोठे बदल झाले. हे बदल एलपीजी गॅस सिलेंडर (LPG gas cylinder) पासून ते बँकेमध्ये करण्यात आले आहे. या बदलांमुळे आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.

दरमहिन्याच्या सुरुवातीला गॅस कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले जातात. यावेळी देखील हा दर जाहीर करण्यात आला असून व्यावसायिक (commercial) गॅस सिलेंडर दरात वाढ करण्यात आली आहे. आता व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 25 रुपये जास्त द्यावे लागतील. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचे दर सध्या स्थिर आहेत.

जीएसटी ई-इनव्हाॅइस (GST e-invoice) मध्ये देखील आता मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल 1 जानेवारीपासूनच लागू करण्यात आला आहे. यापूर्वी ई-इनव्हाॅईसाठी 20 कोटी रुपयांची मर्यादा होती. त्यामुळे ही मर्यादा 20 कोटींवरुन 5 कोटी करण्यात आली आहे.

या नवीन वर्षात आरबीआयकडून (RBI) बँक लाॅकरसंबंधी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. या नियमानुसार ग्राहकांची 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या एका अॅग्रीमेंटवर सही करुन घेण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या लाॅकरमध्ये होणारे बदल ग्राहकांना मॅसेज द्वारे समजणार आहेत.

या नवीन वर्षात तुम्ही जर नवीन गाडी घेण्याचा विचार केला असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. Maruti Suzuki, Audi,Mercedese, MG Motors, Hyundai, Reno यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमतीत वाढ केली आहे.

या काही बदलांसोबत काही नियम फोन निर्मीत कंपन्यासाठीदेखील लागू करण्यात आले आहेत. यानियमाच्या अंतर्गत आता प्रत्येक फोनचा आयएमईआय (IMEI) क्रमांक नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. IMEI क्रमांक सोबत वाढणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दुरसंचार विभागाने हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या