बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | लखनऊ येथे भररस्त्यात तरूणीने एका कॅब ड्रायव्हरला विनाकारण कानाखाली मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. नंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडत गेल्या. आता या प्रकरणात कानाखाली खाल्लेला कॅब ड्रायव्हर सादत अली याने एक निर्णय घेतला आहे. सादत अली याने राजकारणात प्रवेश केला असून या माध्यमातून पुरुषांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात आवाज उठवणार असल्याचं सादत अलीने सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सादत अली याने शिवपाल यादव यांच्या समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सादत अलीने सांगितले , “देशात अशी अनेक प्रकरणं आहेत. जिथे पुरूषांना अजून न्याय मिळालेला नाही. माझ्यावर हल्ला झाल्याचं व्हिडीओ तर संपूर्ण जगाने पाहिलेला आहे. तरी मला अजून न्याय मिळालेला नाही. म्हणूनच राजकारणात येऊन पीडित पुरुषांसाठी लढणार आहे, अशा पीडित पुरुषांना न्याय मिळवून देणार आहे”, असं सादत अली म्हणाला.

सादत अलीला अजूनही न्याय मिळाला नसल्याने सादत अलीने राजकारणाच्या माध्यमातून पुरुषांसाठी लढण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, मी राजकारणात येऊन पुरुषांचा आवाज बनणार आहे. त्याचबरोबर कॅब ड्रायव्हर्सचा आवाज बनणार आहे. जेणेकरुन जेथे पुरुषांवर महिलांकडून अन्याय केला जाईल. तेथे मी पुरुषांच्या बाजूने महिलांच्या विरोधात उभा राहिल”, असं त्याने सांगितलं आहे.

लखनऊ येथील बारबिरवा चौकात 30 जुलै रोजी प्रियदर्शनी या महिलेने सादत अलीला विनाकारण मारलं होतं. तो कॅब चालवत असताना प्रियदर्शनी अचानक समोर आली. ताबडतोब त्याने ब्रेक मारून कॅब रोखली. मात्र, तरीही प्रिदर्शीनीने त्याला रस्त्यावरच जोरजोरात मारायला सुरुवात केली. तिने तब्बल 22 कानाखाली मारल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेलं होतं. यामध्ये प्रियदर्शनीची चुक आढळूनही सादत अलीला अजून न्याय मिळालेला नाही.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More