बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शताब्दी एक्सप्रेसच्या आगीनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | शताब्दी एक्सप्रेसमध्ये लागलेल्या आगीनतंर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रात्रीच्यावेळी प्रवास करताना प्रवाशांना एक्सप्रेसमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही. रात्रीच्या वेळी रेल्वेमधील आगीच्या घटना थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजत आहे.

रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रेल्वेतील चार्जिंग पॉईंट बंद राहणार आहेत. याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबतची ही माहिती दिली आहे. तर याबाबत मुंबई मिररने वृत्त दिलं आहे. दुरवर जाणाऱ्या रेल्वे म्हणजे लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी लोक सिनेमे, क्रिकेटचे सामने इ. पाहत असतात. त्यानंतर रात्री झोपताना आपले मोबईल आणि लॅपटॉप चार्जिंगला लावतात. मात्र यामुळे  ओव्हर चार्जिंग आणि हिटींगमुळे आग लागण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे.  रेल्वेने रात्री चार्जिंग पॉईंट बंद करण्याचा निर्णय का घेतला हे कळत नाही. लॅपटॉप आणि मोबाईल आता आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, असं पॅसेंजर राईट अॅक्टिव्हिस्ट सुभाष गुप्ता यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीतून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी ट्रेनच्या एका कोचला आग लागली होती. त्यावेळी शॉट सर्कीटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या- 

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद शिवकुमारला कोठडीत खायला मटण”

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 3 हजार पार!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

मनोरंजनाच्या पडद्यावर देखील कोरोनाचं सावट ‘या’ शोमधील 18 जणांना कोरोनाची लागण

पैसे थेट खात्यावर जमा करा मग लॉकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More