बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

मुंबई | मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत मंत्रीमंडळाने 6 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रशासकिय दृष्टीकोनातून आणि सामान्य माणसांच्या हिताचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतही निर्णय घेण्यात आले आहेत.

मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याचा पाण्याची ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. प्रथम पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. तर मुंबईच्या गोरेगावमधील सिद्धार्थनगर पत्राचाळ येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला.

जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी 296 कोटी 39लाख रुपयांच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे 18 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यापूर्वी या कंपनीमध्ये 50.5 टक्के सहभाग असणाऱ्या जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपरचे समभाग अदानी एअरपोर्ट होल्डिंग यांनी घेतले आहेत.

दरम्यान, प्रधानमंत्री कृषी सिंचन व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना केंद्र शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य व राज्य शासनाच्या हिश्यापोटी नाबार्डकडून कर्जरुपाने मिळणारी रक्कम महामंडळाच्या खात्यात जमा न करता राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटच्या पहिल्या विश्वचषकावर न्युझीलंडने कोरलं नाव

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

“शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील”

कौतुकास्पद! भर पावसात जेसीबी चालकाची माणुसकी, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More