बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिन्याला फक्त 1000 रूपये जमा करा, काही वर्षांनी मिळतील तब्बल 12 लाख रूपये

मुंबई | आपल्या कडील पैसा आपण नेहमी गुतपण्याचा प्रयत्न करत असतो. फिक्स डिपाॅझीट मध्ये पैसा गुंतवणूक केला जातो. पण या व्यतिरीक्त काही अजून पर्यात सुद्धा आहेत ज्यात पैसा गुंतवूण ग्राहकांना चांगला फायदा मिळत असतो. यातच आता प्रत्येक महीन्याला गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत आहे.

पब्लिक प्राॅव्हीडंट फंड मध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण आता वाढत आहे. या मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला संपुर्ण सुरक्षा प्रदान करण्यात येते. परिणामी तुम्हाला तुमच्या पैश्यांची आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्याची चिंता करण्याची गरज नाही. दरमहीन्याला 1000 हजार रूपये नियमीत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 30 वर्षांनी तब्बल 12 लाख रूपये मिळणार आहेत. याचा लाभ घेण्याचा प्रयत्न ग्राहकांनी करण्याचं आवाहन पीपीएफ कडून करण्यात आलं आहे.

पीपीएफ योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला यामध्ये नियमितता ठेवावी लागेल. दर महिन्याला 1000 रुपये भरत असाल, तर 15 वर्षांत 1.80 लाख रुपये एवढी गुंतवणूक होईल. त्यावर 1.45 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला एकूण 3.25 लाख रुपये मिळतील.

दरम्यान, या योजनेत तुम्ही आपला मॅच्युरिटी वाढवला तर यात तुम्हाला फायदा होणार आहे. आणखी पाच वर्षांनी कालावधी वाढवलात आणि मासिक 1000 रुपये गुंतवणूक सुरू ठेवलीत, तर एकूण गुंतवणूक 2.40 लाख रुपये होईल. त्या रकमेवर 2.92 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर एकूण 20 वर्षांनी एकूण 5.32 लाख रुपये मिळतील. हाच कालावधी तुम्ही 30 वर्षांचा केला की तुम्हाला 12. 36 लाख रूपये मिळतील.

थोडक्यात बातम्या 

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

“72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More