बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला गाशा गुंडाळणार!

नवी दिल्ली |  कोरोनामुळे देशाच्या औद्योगिक क्षेत्राला देखील मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली. अशातच आता अमेरिकेची प्रमुख कार कंपनीच्या विक्रीत घट झाल्याने भारतातून गाशा गुंडाळणार असल्याची माहिती समोर येत आहे. चार चाकी वाहन घेणाऱ्या ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

भारतात गेल्या काही दिवसात अमेरिकेची वाहनं बनवणारी प्रमुख फोर्ड मोटर वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे देशात सुरू असलेले साणंद आणि मराईमलाई हे  दोन्ही कारखाने फोर्ड कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोर्ड कंपनीने यामुळे भारतात गाडीचं नवं मॉडेल लाँन्च केलं नाही. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविसननंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली निर्मिती बंद करणार असल्याची माहिती ‘रायटर्स’ने दिली आहे.

देशातील कारखाने बंद केल्यानंतरही कंपनी आयतीद्वारे गाड्या भारतात विकत राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी डीलर्संना याची मदत होणार आहे.  गेल्या 10 वर्षांत कंपनीला 2 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.  नॉन आपरेटिंगमुळे 2019 साली  फोर्ड कंपनीला 0.8 अब्ज डॉलर्सनं तोटा सहन करावा लागला होता.

दरम्यान, फोर्ड या कंपनीने देशभरात ऑगस्टमध्ये एकुण 1 हजार 508 वाहनांची विक्री केली होती. त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत विक्रीत 68.1 टक्क्यांची घट दिसुन येत आहे.  फोर्ड कंपनी भारतीय बाजारात फोगो हॅचबॅक, एस्पायर सेडान गाड्यांसह एसयुव्ही सेगमेंटमध्ये इकास्पोर्ट, एन्डेव्हर आणि फ्रीस्टाइल मॉडेलची विक्री करत आहे.

थोडक्यात बातम्या- 

नाशिक पोलिसांचा मास्टर प्लॅन! हेल्मेट न घालणं जीवावर नाही तर कानावर बेतणार

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

आपल्या वाढदिवसादिवशी आईच्या आठवणीत अक्षय झाला भावूक, पोस्ट करत म्हणाला….

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने केलंय खास सेलिब्रेशन प्लॅनिंग

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्यावरोधात लुकआऊट नोटीस जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More