रशियाला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धाला दोन आठवडे उलटून गेले तरी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. अशातच ICJ नं रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनच्या जमिनीवर सुरू केलेल्या लष्करी कारवाया तत्काळ स्थगित कराव्या. याबरोबरच रशियन फेडरेशन पुढील लष्करी कारवाईसाठी कोणतीही पावले उचलणार नाही याची खात्री करेल. दोन्ही देशांनी वाद चिघळणाऱ्या कृती पासून दूर रहावं, असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्रेनने रशियामधील खटला जिंकला आहे.
आयसीजेच्या आदेशानंतर युक्रेनचे राष्ट्रअध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे की, रशियाने ताबडतोब आपल्या देशात परत गेलं पाहिजे. ICJ च्या आदेशाचे उल्लंघन केल्यास रशिया आणखी एकटं पडेल.
दरम्यान, रशियाला कडवी झुंज दिल्याबद्दल ICJ कडून युक्रेनचं कौतुक देखील करण्यात आलं आहे. युक्रेनची जनता, सैनिक आणि राष्ट्रअध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमनाविरूध्द दिलेला लढा कौतुकास पात्र आहे असं कौतुक करत रशिया समर्थक देशांनी रशियाला लष्करी मदत देऊ नये, असं आवाहन न्यायालयानं केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
पेमेंट वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यानं लढवली अनोखी शक्कल, ऑफिसमध्येच केलं ‘हे’ काम
‘माझ्यासारखे सेक्सी कपडे घालतात ते…’; नीना गुप्तांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
Comments are closed.