Top News महाराष्ट्र मुंबई

प्रताप सरनाईक प्रकरणासंदर्भात ईडीने केला मोठा खुलासा

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना मनी लॉंड्रिंग प्रकरण चांगलेच अंगलट येणार असल्याचे दिसत आहे. कारण ई़डीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार ईडी कोठडी अहवाल तयार केला आहे व त्यात प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईकांचे नाव घेतले असून, MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा ईडीने न्यायालयासमोर केला आहे.

ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा ईडी कोठडी अहवाल न्यायालयासमोर सादर केला आहे.

दरम्यान, विहंग ग्रुप ऑफ कंपनीच्या डायरेक्टरपदी असलेल्या अमित चंडोळे यांना ईडीने दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’; शहीद जवान यश देशमुख यांच्या अखेरच्या संवादाने पाणावले डोळे

महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या