बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आरोग्य मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यामुळे अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना गाईडलाईन जारी केल्या आहेत.

आता राज्यामध्ये दसरा, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता येणाऱ्या सण-उत्सव साधेपणानं साजरे करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाची येणारी लाट दिवाळीनंतर राज्यात येऊ शकते, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. आजची परिस्थिती पाहता आपण सतर्क राहिले पाहिजे. प्रभाव कमी असला तरी संकट टळलेले नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दसऱ्याच्या दिवसापर्यंत 100 कोटी नागरिकांचं लसीकरण व्हावं असं केंद्र सरकारचं टार्गेट असल्याचं राजेश टोपेंंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अजित पवारांवरील कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी रुग्णालयात दाखल

पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही- योगी आदित्यनाथ

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More