मनिला | ख्रिस्टिना डकेरा या एअर हॉस्टेसचा मृतदेह न्यू इयर पार्टीनंतर एका हॉटेलच्या बाथटबमध्ये सापडला होता. पोलिसांनी तातडीने ही सामूहिक बलात्कार आणि हत्येची केस असल्याचं म्हणत संशयितांना अटक केली होती.
पार्टीत सहभागी उर्वरित नऊ जणांनी 72 तासांच्या आत सरेंडर करावं, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला होता.
तीन संशयितांपैकी ग्रेगोरिओ दे गुझमन याने एबीएस-सीबीएन न्यूजला दिलेल्या मुलाखतीनंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्या पार्टीत सहभागी बाराही पुरुष गे असल्याचा दावा गुझमनने केला. ख्रिस्टिनासोबत पार्टीत सहभागी बाराही पुरुष समलिंगी असल्याची माहिती आता समोर येत आहे.
दरम्यान, वैद्यकीय अहवालात ख्रिस्टिनाचा मृत्यू मेंदूतील गाठीमुळे झाल्याचं समोर आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?”
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवे- यशोमती ठाकूर
‘नायक’ सिनेमाप्रमाणे ही तरूणी ‘या’ राज्याची या दिवशी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री
अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील
“विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्याने मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे”