बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणात मोठा ट्विस्ट; इंद्राणी मुखर्जीनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

नवी दिल्ली | देशभर खळबळ माजवलेल्या शीना बोरा (Sheena Bora) हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee) मोठा दावा केला आहे. इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केलाय. शीना सध्या काश्मीरमध्ये असल्याचं इंद्राणीने म्हटलं आहे. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय (CBI) संचालकांना लिहिलेल्या पत्रात हा दावा केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच जेलमध्ये माझी भेट एक महिलेसोबत झाली होती. त्यावेळी त्या महिलेने मला सांगितलंय की शीना बोरा जिवंत असून ती सध्या काश्मीरमध्ये असल्याचं सांगितलं असा दावा इंद्राणी मुखर्जीने पत्रात केला आहे. त्याचसोबत शीना बोराचा शोध घेण्यात यावा अशी मागणी देखील इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला लिहलेल्या पत्रात केली आहे.

इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे. एप्रिल 2012 मध्ये, नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात तिची विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या ‘Let Me Say It Now’ या पुस्तकात मोठा खुलासा केला होता. त्यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस या प्रकरणाच्या चौकशीमुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे दिलं, असं राकेश मारिया यांनी लिहलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

…अन् यशपाल शर्माने मद्रासचा राग मँचेस्टरमध्ये काढला, पाहा व्हिडीओ

आता श्रेयवादाची लढाई सुरू?, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More