बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियम न पाळणाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई, ॲम्बुलन्समध्ये बसवून कोरोना…पाहा व्हिडीओ

पालघर | कोरोनाचे नियम मोडणारे अनेक नागरिक दररोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येऊनही नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच वसईतील कोरोनाचे नियम मोडणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

नियम मोडून बेजबाबदारपणे घराबाहेर फिरणार्‍या वसई परिसरातील दोन तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवत बळजबरी ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं. यावेळी या दोघांनी पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना उचलून अक्षरश: रुग्णवाहिकेत फेकलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नियम मोडणाऱ्या लोकांवर अशाप्रकारे कारवाई होत असल्याने नागरिकांची आता नियम मोडण्याची हिम्मत होणार नाही, असा विश्वास देखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, येथील स्थानिक नागरिकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत पोलीस सुरुवातीला त्या तरुणांची चौकशी करत असताना दिसून येतात. त्यानंतर, त्यांचे घराबाहेर पडण्याचे कारण वैध नसल्याने आणि दुचाकीवर दोघे जण प्रवास करत असल्याने पोलिसांनी त्या दोघांनाही पकडून एका पाठोपाठ एक रुग्णवाहिकेत बसवलं आणि रुग्णालयात नेलं.

वसई पोलिसांकडून होत असलेल्या या अनोख्य़ा कारवाईमुळे नागरिक आता तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून नियमांचं पालन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू देखील आवरता येणार नाही.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

पुण्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा थरार, 10 जणांच्या टोळक्याकडून सपासप वार!

कोरोनामुळे ‘या’ तालुक्यातील दोन कुटुंबे उद्ध्वस्त, आठ दिवसांत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू

तौक्ते चक्रीवादळाचा यंदाच्या मान्सूनला होणार फायदा

कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हाला ‘ही’ लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका

“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More