बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एनसीबीकडून ‘या’ व्यक्तीला अटक

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात NCB ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. NCB ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे.

एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे. सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची कारवाई केली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली केली होती. या घटनेने संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं. चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“दुर्दैवाने मी आमदार झालो नाही, अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा राजीनामा दिला असता”

लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून ‘या’ पुरवठादाराची माघार; मुंबई महापालिकेच्या अडचणीत वाढ

जलतरणपटू सुयश जाधवने महाराष्ट्राची मान आणखी उंचावली; रोहित पवारांकडून कौतुकाची थाप

अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे सरकार कोसळेल- तृप्ती देसाई

चेन्नई संघाला मोठा धक्का! कर्णधार धोनीचा CSK ला गुडबाय?; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More