बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही…’; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. दम असता तर ते घरात बसले नसते असा खोचक टोला खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या संघटनेशी राजकीय युती केल्याची आज घोषणा केली. त्यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपच्या प्रभावाखाली येणाऱ्या मराठा व्होट बँकेला लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मात्र हिंदुत्वविरोधी संघटनेशी बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More