खारेपाटण | आजची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात (Accident) झाला आहे. या अपघाामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीला जात असताना खारेपाटण चेकपोस्ट या ठिकाणी अपघात घडला.
आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्या होत्या. त्यातील एका गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे त्या गाडीपाठीमागून येणाऱ्या तीन ते चार गाड्या एकमेकांवर येऊन धडकल्या.
दरम्यान, या धडकेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे.
थोडक्यात बातम्या –
पुढच्या टार्गेटवर कोणता मंत्री असणार?, किरीट सोमय्या म्हणाले….
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर
मोठी बातमी ! मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना मोठा दिलासा
अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार?, ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
“राज्यात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही वीज पुरवठा थांबणार नाही”
Comments are closed.