मुंबई | सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हे 40 लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-