बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली होती. अशातच आता राज्य सरकारने पुन्हा मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेलं आहे अशाच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. असं असलं तरी राजकीय सभांना आणि जाहीर कार्यक्रमांना मात्र परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोनाचे नियम पाळले नाहीत, अशा लोकांकडून घेण्यात आलेला दंड देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मास्क घातला नसेल तर त्या व्यक्तीला 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये जर कोणी मास्क घातलेला नसेल तर प्रवाशाला 500 रूपये दंड आणि चालकाला देखील 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तर दुकानदारांना देखील मास्क घातला नसल्यावर 500 रूपये दंड घेण्यात येईल.

मुंबईतील एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी गंभीर इशारा दिला होता. डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली होती. अशातच आता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आणीबाणी जाहीर! ‘या’ शहरात कोरोनाने माजवला हाहाकार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने राज्यात खळबळ; बीएमसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धक्कादायक! अहमदनगर येथे एसटी बसेसवर दगडफेक

“सरकार पडणार असं बोललं जात आहे, पण चाललंय ना बाबा सरकार”

“…यासाठी सत्ताधारी सेनेला किती दंड आकारायचा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More