मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. तसेच संजय राऊत यांच्या अडचणी आता पत्रचाळ प्रकरणात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने राऊतांना ताब्यात घेतल्याचं कळतंय.
ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले.
ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडतीला सुरुवात केली.
संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत.
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं
“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”
मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य, लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार
‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही’, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”
Comments are closed.