मुंबई | शिवसेना(Shivsena) खासदार संजय राऊतांच्या(Sanjay Raut) विरोधात भाजप(BJP) नेते किरिट सोमय्या(kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या(Medha Somaiya) यांनी मानहानीचा दावा करत हे प्रकरण कोर्टापर्यंत नेलं होतं.
याप्रकरणी राऊतांच्या विरोधात अजामीनपत्र वाॅरंट जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणी न्यायालयाची पुढची सुनावणी 24 जानेवारीला पार पडणार आहे. त्यामुळं राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नुकतेच भाजप नेते नारायण राणेंनी(Narayan Rane) राऊतांना पुन्हा जेलवारी घडवणार असा इशारा दिला होता. त्यातच शुक्रवारी राऊतांविरोधात अजामीनपत्र वाॅरंट जारी करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जी मागील सुनावणी झाली होती, त्या सुनावणीला राऊत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळं जबाब नोंदवण्यासाठी राऊतांना हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावे, अशी मागणी मेधा यांनी न्यायालयाकडं केली होती.
दरम्यान, शंभर कोटी रूपयांचा शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊतांनी सोमय्या यांच्यावर केला होता. या प्रकरणी मेधा यांनी शिवडी कोर्टात राऊतांविरोधात मानहानीचा दावा केला होता.
थोडक्यात बातम्या-
- संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं घ्यायचा विचार करताय! मग जाणून घ्या ताजे दर
- उर्फीच्या कपड्यावरून वाद आणखीच पेटला, अक्षरश: चित्रा वाघ-रूपाली चाकणकर एकमेकींना भिडल्या
- मन सुन्न करणारी घटना; आजोबा-नातवाचा दुर्देवी अंत
- बाबो ऋषभ पंतला पाहायला उर्वशी पोहचली रूग्णालयात?
- फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार?, योगी आदित्यनाथ यांची स्पष्ट भूमिका