सर्वात मोठी बातमी! शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहणार
मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे.
शरद पवार(sharad pawar) हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबतची माहिती देणार आहेत.
प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधत फक्त तीन ओळीचं निवेदन सादर केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असं पटेल यांनी जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.
2 मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा आम्हाला अनपेक्षित होती. असं काही होईल हे वाटलं नव्हतं. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही आश्चर्यचकीत झालो. त्यानंतर आम्ही सर्वांनीच त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनीही आग्रह धरला, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
- “…तर शिवसैनिक तुम्हाला कुत्र्यासारखा फोडून काढतील”
- “40 आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला”
- “मी शरद पवारांना सल्ला कसा देणार?, त्यांना माझा सल्ला पचनी पडेल काय?”
- “अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते”
- अजित पवारांबाबत शालिनीताई पाटलांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ!
Comments are closed.