Maharashtra Assembly Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. सर्वाधिक जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. आता विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने रेकॉर्ड मोडला आहे.
सर्व एक्झिट पोल राज्यात फेल ठरले आहेत. भाजपाची त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे. राज्यात भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकासआघाडीच्या एकत्रित जागाही अत्यंत कमी आहेत. लाडकी बहिण योजना आणण्याचा निर्णय महायुतीसाठी गेमचेंजर ठरला आहे.
महायुती सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना’ ही या विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेली दिसून येत आहेत .
लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला विजयी केल्याचे दिसून येत आहे. कारण महायुती सरकारला सर्वाधिक 216 जागांवर आतापर्यंत विजय मिळवता आला. असून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुती सरकारच येणार असं एकूण निकालावरून दिसत आहे. याशिवाय भाजपाला सर्वाधिक मतं देऊन राज्यातील भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार
प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?
निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच
‘राज’पुत्र अमित ठाकरे आघाडीवर की पिछाडीवर?, माहीमचा निकाल पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा