बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!

हवेली | पुण्यात महाविकास आघाडी सरकारने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडीचा प्रयोग पुणे जिल्ह्यात यशस्वी झालाय.

हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिलाय. या पाठिंब्यामुळे हवेली पंचायत समितीच्या उपसभापती पदावर महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर विजयी झाल्यात.

हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हेमलता बडेकर यांच्याविरूद्ध भाजपचे पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव होते. हेमलता बडेकर यांनी 16 विरुध्द 3 अशा फरकाने अनिरुद्ध यादव यांचा पराभव केलाय.

या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतर्फे हेमलता बडेकर यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिरुद्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हेमलता बडेकर यांना पाठिंबा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर नितीशकुमार उद्या विरोधकांपुढेही झुकलेले दिसतील- चिराग पासवान

…तर साष्टांग नमस्कार घालण्यास देखील मी तयार- उदयनराजे भोसले

पोलीस समोर आला; वाहनचालक त्याला बोनेटवर घेऊन निघाला; थरार CCTVत कैद!

ऑनलाईन वर्गाला ‘इतक्या’ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर!

नाट्यगृहांचं भाडं कमी करणार- मुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More