बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फेसबुक लाईव्ह म्हणजे नुसत्या कोरड्या गप्पा’; मुख्यमंत्र्याच्या भाषणावर भाजपने विचारले हे ‘6’ प्रश्न

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होत असल्यानं राज्यातील लाॅकडाऊन आता काढण्यात येईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला होती. मात्र पुन्हा 15 दिवस त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना दिली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल तर काही जिल्ह्यात आणखी कडक केले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणावर टीका केली आहे.

नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा, ना विचार… किमान उत्तरे हवी होती, असं केशव उपाध्ये म्हणाले. त्यासोबत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणावर प्रश्न उपस्थित केले  आहेत.

1.गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार?

2.महिन्या भरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार?

3.राज्यांने महीना भरात लस विकत का घेतली नाही?

4.शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परिक्षा न घेणे का?

5.महाराष्ट्राचं अर्थचक्र कधी फिरणार?

6.माझं गाव करोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार? , असे 6 प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एकीकडे सरकार कोरोना कमी होतोय असं म्हणत आपली पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन वाढवायचा निर्णय घेऊन काय सिद्ध करतयं हेच कळत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

‘तुमचा मनसैनिक खचलाय, आता याला तुम्हीच उत्तर द्या’; मनसे पदाधिकाऱ्याची राज ठाकरेंकडे मागणी

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

“70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात विकायला काढलं”

…म्हणून आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटी रुपयांची नोटीस

मुंबईतील कोरोना आटोक्यात; वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More