परळी | समाजभावना न समजणारे असं बालबुद्धीचं सरकार मी कधीच पाहीलं नाही, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते परळीत मराठा आंदोलनात बोलत होते.
मराठा आरक्षणाची लढाई प्रतिष्ठेची नसून पोटाची आहे, तसंच या मुद्यावर सभागृहात अनेक वेळा प्रस्ताव मांडला मात्र सरकारला जाग येत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावर सरकार किती दिवस चालढकल करणार माहित नाही, पण आरक्षण मिळेपर्यत मागे हटायचं नाही, असा सल्ला त्यांनी यावेळी मोर्चेकऱ्यांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या–
-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील
-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!