सिंधुदुर्ग | राज्यात मराठा आंदोलन चिघळल्यास त्यास भाजप सरकार जबाबदार राहील, असं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारकडून मराठा समाजाला गृहीत धरले जात आहे. मराठा क्रांती मोर्चानंतर सरकारने वेळीच पावलं उचलत आरक्षणासंदर्भात आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असं ते म्हणाले.
दरम्यान, आंदोलनाची दिशा, स्वरूप बदलत असून मराठा समाजाचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घ्यायला हवा, असंही ते म्हणाले
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?
-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक
-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे
-…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री
Comments are closed.