Nitesh Rane | मुस्लिम समाजाबद्दल नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदायाने याला जोरदार विरोध सुरू केला आहे. आता भाजपमधील (BJP) मुस्लिम नेत्यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.
सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने आणि गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता, भाजपच्याच मुस्लीम नेत्यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय. तसेच, तू वेळ आणि तारीख सांग, मी इथेच आहे, अशा शब्दात इशारा देखील दिला आहे.
भाजप नेता थेट नितेश राणेंना भिडला
भाजपच्याच मुस्लीम नेत्यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय. तू वेळ आणि तारीख सांग, मी इथेच आहे, अशा शब्दात राणेंना इशारा देखील दिला आहे.
भाजप नेते हाजी अरफात शेख यांच्या घराबाहेर नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. नितेश राणेंनी कुर्ल्याच्या मशिदीमध्ये यावं, असं चॅलेंजच त्यांना शेख यांनी दिलंय.
“धर्माबद्दल बोलला तर याद राख”
आपण भाजप नेत्यांकडे तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. जर राणे असंच बोलत राहिले तर आपण भाजपमध्येच राहून त्यांना उत्तर देत राहणार असल्याचंही हाजी अराफत शेख यांनी म्हटलंय.
तू मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो, ते सोड कुर्ल्याच्या मस्जिदमध्ये येऊन तर दाखव, अशा शब्दात हाजी अराफत शेख यांनी आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) इशारा दिला आहे. तसेच, यापुढे माझ्या धर्माबद्दल आणि धर्मगुरूबाबत बोलला तर याद राख, असंही शेख यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
गरोदर महिलांनो या महिन्यात आहे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि तारीख
लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद?; शिवसेना नेते दादांवर भडकले
शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरूंना द्या खास शुभेच्छा; शिक्षक होतील खूश
भाद्रपद महिन्यात नशिब फळफळणार, या ‘5’ राशीवाल्यांचं भाग्य उजळणार!