महायुतीत दोस्तीत-कुस्ती?; भाजप नेत्याने शिवसेनेचं टेंशन वाढवलं

Jalna | जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहे. जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्ष या निवडणुकीत जोमाने कामाला लागलेत. पण जालन्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गटात सहभागी झालेल्या अर्जुन खोतकर जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मोठा चेहरा आहेत. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या शिवसेनेने खोतकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

महायुतीत दोस्तीत-कुस्ती

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी घोषित झाली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ भास्कर दानवे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. कारण जालना विधानसभा मतदार संघात आपण रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दहा वर्षांपासून भाजपा पक्ष वाढीचे आणि विकासाची कामे केल्याचा दावा भास्कर दानवे यांनी केला आहे.

शिवसेना फुटल्यानंतर खोतकर यांनी शिंदे सेना जवळ केली. पण त्यांचे आणि भाजपचे संबंध कधी जुळले नाहीत. दोघांमध्ये गेली पाच वर्षे धुसफूस दिसून आली. खोतकर आणि दानवेंचा वाद सर्वश्रूत आहे पण सत्तेत एकत्र असल्याने त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र हे काही शक्य झालं नाही. दोघांनी अनेकदा एकमेकांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळालं होतं. आता विधानसभेला देखील हा वाद उफाळून येताना दिसत आहे.

Mahayuti Mahayuti | खोतकरांचा भाजपला इशारा

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खोतकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. त्यांनी जर आपलं काम केलं नाही तर आपण ही त्यांचं काम करायचं नाही, असा सूचक इशाराही दिलाय.

दसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे. पण काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांनी देखील दावा ठोकल्यामुळे काँग्रेसमध्येच ओढतान पाहायला मिळत आहे. कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाल्यावर अब्दुल हफिज अपक्ष उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंनी ‘या’ दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म!

शर्मिला ठाकरेंनी ओवाळणीत मागितली चक्क ‘आमदारकी’; नेमकं काय घडलं

’63 वर्षीय अभिनेत्यासोबत सेक्स सीन करताना त्यांनी मला…’; मल्लिका शेरावतकडून मोठा खुलासा

आता सुट्टी नाहीच; मनोज जरांगेंनी कोणाला केलं टार्गेट?

‘या’ मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना भिडणार?