बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही भाजपत या आम्ही तुम्हाला पैसे अन् कॅबिनेट मंत्रिपद देऊ’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान (AAP MP Bhagwant Maan) यांनी भाजप (BJP) नेत्यावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर पंजाबमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

भगवंत मान यांनी सांगितले, मला एका भाजपच्या मोठ्या नेत्याचा फोन आला होता. त्यांनी मला फोनवर भाजपमध्ये येण्यासाठी तुम्ही काय घ्याल? तुम्हाला किती पैसै हवेत ? असं विचारलं. पुढे तुम्ही खासदार आहात आणि एकमेव खासदार आहात. त्यामुळे तुमच्यावर पक्षांतर्गत बंदीचा कायदा लागू होणार नाही, असंही म्हटलं असल्याचं भगवंत मान यांनी सांगितलं आहे.

शिवाय पुढे त्या नेत्याने तुम्ही भाजपत या आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देऊ अशी ऑफर दिली असल्याचं भगवंत मान यांनी सांगितलं. पुढे मी त्या भाजप नेत्याला मी एका मोहीमेवर आहे, कमिशनवर नाही. मी भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना ते सोडून पंजाबच्या हक्कासाठी राजकारणात आलो आहे, असं म्हणालो असल्याचं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यातचं भगवंत मान यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपने भगवंत मान यांनी ऑफर देणाऱ्या नेत्याचं नाव उघड करावं असं आव्हान दिलं आहे. शिवाय भगवंत मान हे केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं महत्त्व वाढवण्यासाठी हे आरोप करत असल्याचा दावाही भाजपने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More