बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेेनेचं हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा सिद्ध झालंय”

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक सण उत्सव साजरा करण्यासंदर्भात बंदी घातली होती. तिसऱ्या लाटेची शक्यता आता काहीशी धूसर होत असली तरी कोरोनाचे निर्बंध अजूनही राज्यात लागू आहेत. अशातच आता राज्य सरकारने ईद-ए-मिलादसाठी मुंबई आणि इतर उपनगरात मिरवणूक काढण्यासाठी परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काॅंग्रेसला खुश करण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याकांचं पुन्हा एकदा लांगूनचालन करण्यात आलं आहे. यामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेेनेचे हिंदूत्व किती ढोंगी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालणाऱ्या सेनेने ईद मिरवणुकीला मात्र परवानगी दिली? जनादेशाचा अनादर करून काॅंग्रेस सोबत सत्तेत बसायचे. शिवाजी पार्क उजळविण्याच्या नावाखाली इटालियन दिवे वापरून गांधी परिवाराला खुश ठेवायचे, यातून जनाब सेनेची वाटचाल काॅंग्रेसच्या प्रकाशाखाली होत असल्याचं दिसत आहे, असंही अतुल भातखळकर म्हणाले.

हिंदूत्व हे काही सोयीच हत्यार नाही, पाहिजे तेव्हा काढायचं पाहिजे, तेव्हा म्यान करायचं. हिंदूत्व ही चळवळ आहे. परंतु हिंदूत्वाची भूमिका मांडताना शिवसेनेची सध्या कसरत होत आहे. कारण एकाबाजुला संमिश्र विचारधारा असणारी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या साथीने शिवसेनेला सरकार टिकवायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या हिंदूत्वाच्या भूमिकेवरून शिवसेनेला आपले अस्तित्व सुद्धा टिकवायचं आहे, असा टोलाही प्रविण दरेकरांनी शिवसेनेला लगावला.

दरम्यान, कोरोना महामारीत राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधाचे नियम घालून दिले होते. त्यामुळे कोरोना धोका लक्षात घेऊन आता एक एक गोष्टी राज्य सरकार सुरू करत आहे. गेल्या महिन्यातील अनेक सणांच्या वेळी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता तेच निर्बंध राज्य सरकार शिथील करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“राहुल गांधींना ड्रॅग्जचं व्यसन, ते ड्रॅग्ज तस्करी देखील करतात”

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच बंड! म्हणतो, “माझ्यासाठी ती खासगी गोष्ट, मी सांगणारच नाही”

अंधश्रद्धेचा बळी, सर्पदंश झाल्यावर 3 तास ठेवले मारूती मंदिरात

“भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये, पुण्याचं महापौर पद आम्हालाच पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More